महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

 

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार दिपक पायगुडे, बाळासाहेब आमराळे, हेमंत रासने, गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील यांनी महात्मा फुले यांच्या निवास्थानी असलेल्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या १ लाख नागरिकांसाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते मिसळ बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला. पालकमंत्री श्री.पाटील यांनी भिडेवाडा येथेही भेट देऊन महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला वंदन केले.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजना
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होणार नाही, प्रसार भारतीचे स्पष्टीकरण
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image