देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करताना सीबीआयनं मागे हटू नये, असं आवाहनही त्यांनी आज केलं. नवी दिल्लीत सीबीआयच्या हीरकमहोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. त्यांनी आज पुणे, नागपूर आणि शिलाँग इथल्या सीबीआयच्या नव्यानं बांधलेल्या कार्यालयीन संकुलाचंही दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केलं. 

गेल्या साठ वर्षांपासून सीबीआयला बहुआयामी आणि बहु अनुशासनात्मक म्हणून ओळखलं जात असल्याचं ते म्हणाले. आपल्या कामातून, कार्यक्षमतेतून सीबीआयनं लोकांचा विश्वास संपादित केल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या बँकिंग क्षेत्राला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सध्याचं सरकारनं खूप मेहनत घेतल्याचं मोदी म्हणाले. काळ्या पैसा जमा करणाऱ्यांविरोधात सरकार युद्धपातळीवर काम करूत असून भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. 

त्यांनी यावेळी सीबीआयच्या १८ अधिकाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित केलं. त्यांनी सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून तीन अधिकाऱ्यांना सुवर्णपदक देऊन गौरवलं. त्यांनी यावेळी सीबीआयच्या हीरकमहोत्सवानिमित्त टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं अनावरण केलं. त्यांनी सीबीआयच्या ट्विटर हँडलचंही उद्घाटन केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल,केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि सीबीआयचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. १ एप्रिल १९६३ रोजी गृह मंत्रालयानं केलेल्या ठरावाद्वारे सीबीआयची स्थापना झाली. 

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image