कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी कंत्राटामध्ये संविधानिक दायित्वाचा समावेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या कंत्राटात संविधानिक दायित्वाचा समावेश करण्याच्या सूचना केंद्रीय कामगार मंत्रालयानं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. यासाठी महा संविधानिक दायित्वं मंत्रालयानं सरकारच्या ई-मार्केटिंग पोर्टलवर नमूद केली आहेत. संबंधितांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची आणि ईएसआयसीची तरतूद वेळच्या वेळी करणं, संबंधित सरकारच्या तरतुदींनुसार किमान वेतन कंत्राटी कामगारांना देणं, त्यांच्या वेतनात कोणतीही अनधिकृत कपात न करणं, बोनस देण्यासंबंधींच्या कायद्यानुसार योग्य ती रक्कम त्यांना देणं अशा तरतुदींचा यात समावेश आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image