राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रदान केलेल्या नवोन्मेष पुरस्कारात राज्यातल्या चौघांचा गौरव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ११ व्या द्वैवार्षिक नॅशनल ग्रासरुट इनोव्हेशन अँड आऊटस्टँडिंग ट्रॅडिशनल नॉलेज नवोन्मेष पुरस्कारांचं वितरण केलं. नवोन्मेषाच्या संदर्भातल्या एका महोत्सवातचं उद्घाटनंही केलं. देशातल्या तळागाळात राहणाऱ्या नागरिकांना विज्ञान आणि तंत्रज्ञानात मोठं योगदान देण्याची संधी असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. राज्यातल्या रवि गणपत चोपडे यांना "सहा ॲक्सीसच्या गोल्डन एम्बाॅसिंग मशीनसाठी",  इंद्रजित खस यांना "ट्री रुट पुलरसाठी " तर सचिन कारेकर यांना "  एसके-4 या : सुधारित उच्च उत्पन्न देणारी हळद वाणासाठी" राष्ट्रीयस्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. याशिवाय, सुनील शिंदे यांना "रेशीम किड्यांचे प्रजनन नेट फोल्डिंग मशीन" साठी राज्य स्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

गेल्या नऊ वर्षांत भारतातल्या स्टार्टअप्सची संख्या तिनशे पटीनं वाढली आहे, असं  विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितलं. २०१४  मध्ये साडेतिनशे स्टार्टअपच्या तुलनेत आता देशात शंभरपेक्षा जास्त युनिकॉर्न असलेले ९० हजार स्टार्टअप्स आहेत.  या कालावधीत बायोटेक स्टार्टअप्सची संख्याही ५० वरून सहा हजारांवर गेली असल्याचं सिंग यांनी स्पष्ट केलं. त्यांनी या वाढीचं श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २०१६ मधील विशेष स्टार्टअप योजना आणि खाजगी सहभागासाठी अवकाश आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रं उघडण्याला दिलं. डॉ. सिंग यांनी राष्ट्रीय नवोन्मेष पुरस्कार विजेत्यांचंही कौतुक केलं.