राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्र सरकारची मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) क्वांटम तंत्रज्ञानच्या आधारे आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि भारताला या क्षेत्रातला अग्रगण्य देश बनवण्यासाठी राष्ट्रीय क्वांटम मिशनला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. २०२३-२४ ते २०३०-३१ या कालावधीसाठी ६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या मोहिमेला मंजुरी दिली असल्याचं बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बातमीदारांना सांगितलं.

हा निर्णय देशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल, असं ते म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत इतर विभागांच्या भागीदारीत हे अभियान राबवलं जाणार आहे.चित्रपट उद्योगातल्या पायरसीला आळा घालण्यासाठी चित्रिकरण सुधारणा विधेयक आणायचा निर्णय सरकारनं घेतला आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं. याबाबतचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.