पहिल्या ‘हिंदयान’ सायकल स्पर्धकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

 

मुंबई : फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली – पुणे ‘हिंदयान’ सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि.५) राजभवन येथे पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

‘हिंदयान फाऊंडेशन’ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

 

भारतामध्ये देशव्यापी सायकल स्पर्धा होत नसून या दृष्टीने ‘हिंदयान’ने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे असे सांगून राज्यपालांनी सर्व स्पर्धक व आयोजकांचे अभिनंदन केले.

यावेळी हिंदयान फाऊंडेशनचे संस्थापक व सायकल स्पर्धेचे प्रवर्तक विष्णूदास चापके, अतिरिक्त पोलिस महासंचालक रवींद्र सिंघल, कर्नल विमल सेठी, लेफ्ट. कर्नल. एस. चौधरी, कॅप्टन जयशंकर व एमसीपीओ ऋषीकुमार  हे उपस्थित होते.