सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेतसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुदानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आणि मायदेशी परत येण्याची इच्छा असणाऱ्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मंत्रालय विविध संबंधित यंत्रणाशी समन्वय साधत आहे. भारतीय वायु दलाची दोन सी-130 जे ही विमानं आपत्कालीन व्यवस्थेसाठी जेदाह मध्ये तैनात आहेत तर INS सुमेधा सुदानच्या बंदरावर भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी पोहोचलं आहे. अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजना
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
कोणत्याही राज्यात कोणतेही रेडिओ स्टेशन बंद होणार नाही, प्रसार भारतीचे स्पष्टीकरण
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image