लष्करी अधिकाऱ्यांच्या पाचदिवसीय परिषदेला सुरुवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली द्वैवर्षीक परिषद आजपासून सुरू झाली. ही ५ दिवसीय परिषद या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी लष्कराचे कमांडर आणि इतर वरिष्ठ अधिकारी भेटतील आणि दिल्लीला रवाना होतील. परिषदेदरम्यान, सर्वोच्च नेतृत्वाकडून सध्याच्या आणि भविष्यातल्या संरक्षण विषयक  परिस्थितीचा  आणि लष्कराच्या युद्धसज्जतेचा आढावा घेतला जाईल. अग्निपथ योजना, डिजिटायझेशन, ऑटोमेशन उपक्रम, लढाऊ अभियंता कार्ये, बजेट व्यवस्थापन यावरील प्रगतीसह परिवर्तन वर्ष-२०२३ चा भाग म्हणून केलेल्या प्रगतीचाही आढावा यादरम्यान घेण्यात येईल. येत्या बुधवारी  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या परिषदेला संबोधित करणार आहेत. तसंच संरक्षण दल प्रमुख, नौदल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख देखील या परिषदेला संबोधित करतील.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image