किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) किसान प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर इथं किसान मेळ्यात होत असलेल्या पशुप्रदर्शनीची प्रशंसा करताना बोलत होते.अशा किसान मेळ्यांमधून देशातले अन्नदाता बंधू, भगिनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करत असून त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या साधनांमध्येही वाढ होत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.