ईडीतर्फे बीबीसी विरोधात गुन्हा दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सक्तवसुली संचालनालयानं आज ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसी विरोधात परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. परकीय चलनामध्ये अनियमितता आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या बरोबरचं ईडीनं काही कागदपत्रं आणि अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवले आहेत.

बीबीसी मध्ये असलेल्या थेट परकीय गुंतवणूक नियमांचंही उल्लंघन झाल्यानं इडीनं हा गुन्हा नोंदवला आहे. या आधी फेब्रुवारी महिन्यात आयकर विभागानं करचुकवेगीरीच्या संशयावरून  बीबीसीच्या कार्यालयांवर छापे टाकले होते.