रस्ते वाहतूक क्षेत्राबाबत धोरण निश्चितीमध्ये राज्यांनी सहकार्य करण्याचे नितीन गडकरी यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रस्ते वाहतूक आणि हाय-वे मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक क्षेत्राच्या परिवर्तनासाठी सर्व राज्यांनी धोरण आणि व्यूहरचनेला अधिक बळकट करण्यासाठी सशक्त पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं आहे. नवी दिल्ली इथं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीत अध्यक्षपदावरून काल ते बोलत होते. रस्ते वाहतूक नियमांचे पुनरावलोकन, वाहन फिटनेस  केंद्रांची स्थापना, ई-बसकरता  वित्तपुरवठा सुव्यवस्थित करणे तसचं ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणे यासह विविध समवर्ती धोरणात्मक बाबींचा यात समावेश आहे.

या बैठकीत १५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील परिवहन मंत्री सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान, त्यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकारांचं समर्थन  आणि  कौतुकही केलं. गडकरी यांनी  राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या विविध उपक्रमांची दखल घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं . चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा शिकाऊ परवाना जारी करण्याची प्रक्रिया मजबूत करण्याशी संबंधित होता. बैठकीदरम्यान, रस्त्यांवरील वाहतूक नियम आणि जबाबदारी ने वाहन चालवण्यासाठी चालकांच्या शिक्षणावर भर देण्याची सूचना करण्यात आली.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image