सिक्कीम मधल्या गंगटोक जिल्ह्यात भूस्खलन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सिक्कीम मधल्या गंगटोक जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३१० वर जवाहरलाल नेहरू मार्गावर १४ मैल परिसरात अचानक झालेल्या भूस्खलनात २५ ते ३० पर्यटक आणि पाच ते सहा वाहनं अडकून पडली आहेत. आतापर्यंत २३ पर्यटकांना वाचविण्यात यश आलं असून त्यापैकी सहा पर्यटकांची खोल दरीतून सुटका करण्यात आली आहे. त्या सर्व पर्यटकांना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

बर्फाच्या ढिगाऱ्याखाली जवळपास दीडतास अडकून पडलेल्या एका महिलेची सुटका करून गंगटोक इथल्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. याशिवाय, रस्त्यावरून बर्फ हटवून अडकलेल्या ३५० पर्यटकांची आणि ८० वाहनांची सुटका करण्यात आली आहे.भारतीय सैन्य दल,  सीमावर्ती रस्ते संस्था अर्थात BRO, राज्य आपत्ती व्यवस्थापन दल, पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत बचावकार्य अद्याप सुरूच आहे. 

Popular posts
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
Image
‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक - राज्यपाल
Image
करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन
Image
दावा न केलेल्या ठेवी शोधून त्या लाभार्थ्यांना परत मिळवून देण्यासाठी केंद्रीकृत संकेतस्थळ विकसित करण्याची भारतीय रिझर्व बँकेची घोषणा
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image