७१ हजार नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र सरकारमध्ये सुमारे ७१ हजार नव्यानं भरती झालेल्यांना नियुक्तीपत्रांचं वितरण केलं .यावेळी, प्रधानमंत्र्यांनी सर्व नवीन भरती झालेल्यां कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. राष्ट्राच्या विकासात हातभार लावण्याची ही त्यांच्यासाठी संधी असल्याचं ते म्हणाले. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार तरुणांच्या प्रतिभा आणि उर्जेला योग्य संधी देण्यासाठी वचनबद्ध आहे असं त्यांनी नवीन नियुक्त कर्मचाऱ्यांना संबोधित करताना म्हटलं आहे. आजच्या नवीन धोरणानं देशात नवीन संधींची दारं उघडली असून, भारत ही सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि जग भारताकडे आशेने पाहत आहे यावर त्यांनी यावेळी भर दिला. नवीन नियुक्त झालेले केंद्र सरकारमध्ये ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट प्रोफेसर, शिक्षक आणि परिचारिका या पदांसह विविध पदांवर रुजू होतील.