भारत जागतिक पोलाद विकासाच्या केंद्रस्थानी असेल - ज्योतिरादित्य शिंदे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडिया स्टील २०२३' या पोलाद उद्योगावरील तीन दिवसीय परिषद आणि प्रदर्शनाचे काल  मुंबईत केंद्रीय पोलाद आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांच्या हस्ते उद्घाटन झाले. केंद्रीय पोलाद मंत्रालयाने, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासह, फिक्कीच्या सहकार्याने मुंबईत, गोरेगावच्या प्रदर्शन केंद्रात ही तीन दिवसीय परिषद आयोजित केली आहे. पोलाद क्षेत्रातील उद्योग प्रमुख, धोरणकर्ते आणि तज्ञांना एकत्र आणून, या क्षेत्रातील अत्याधुनिक घडामोडी, आव्हानं तसंच संधी यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेत, केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने, पोलाद क्षेत्रासह, संपूर्ण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत. गेल्या दशकात, भारतातील पोलाद क्षेत्रात,सहा टक्क्यांपर्यंत  स्थिर वृद्धी झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. जागतिक पोलाद संघटनेतील तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या काळात भारत, जागतिक पोलाद वृद्धिच्या केंद्रस्थानी असेल, असंही ते म्हणाले. वर्ष २०२२ मध्ये देशातील तयार पोलाद उत्पादने, ६ टक्क्यांनी वाढली आहेत, मात्र त्याचवेळी जागतिक पोलाद उत्पादनात ४ पूर्णांक २ दशांश ट्क्क्याची घट झाली, असंही ते म्हणाले. उद्योग आणि सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नाद्वारे सरकार, ‘सुविधा प्रदात्याची’ भूमिका साकारणार असल्याचही सिंधीया यांनी सांगितलं.

Popular posts
भारताला रशियाकडून एस ४०० क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर निर्बंध न लादण्याचा अमेरिकेचा निर्णय
Image
डीआरडीओने विकसित केलेल्या स्वदेशी अँटी रेडिएशन क्षेपणास्त्राच्या (रूद्रम) उड्डाणाची चाचणी यशस्वी
Image
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image