किसान क्रेडिट कार्ड आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन सुकर करत आहे : पंतप्रधान

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) किसान क्रेडिट कार्ड आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन सुकर करत आहे आणि त्याचे प्रमुख उद्दिष्टही तेच आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हाथरस इथले खासदार राजवीर दिलेर यांनी एका ट्विट थ्रेडमध्ये किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल सांगितले आहे.

हाथरस इथल्या खासदारांनी केलेल्या ट्विट थ्रेडला उत्तर देताना, पंतप्रधानांनी ट्विट केले आहे; “किसान क्रेडिट कार्डने आपल्या कष्टाळू अन्नदात्यांचे जीवन सुलभ केले आहे, या गोष्टीचा आनंद वाटत आहे. याचे प्रमुख उद्दिष्टही तेच तर आहे!” 

यह देखकर बहुत खुशी हो रही है कि किसान क्रेडिट कार्ड ने हमारे परिश्रमी अन्नदाताओं का जीवन आसान बनाया है। यही इसका मूल उद्देश्य भी तो है! https://t.co/rOu4ehk4Ia