मुंबई मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी केला प्रवास

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोच्या मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो टप्पा १ सुरु झाल्यानंतर दिवसाला सरासरी ३० हजार ५०० प्रवासी प्रवास करत होते, त्यात १७२ फेऱ्यांचा समावेश होता. याचबरोबर टप्पा २ सुरु झाल्यानंतर या संख्येत वाढ होऊन २४५ मेट्रो फेऱ्यांनी दिवसाला सरासरी १ लाख ६० हजारापेक्षा जास्त प्रवासी मेट्रोनं प्रवास करू लागले आहेत. मुंबईकरांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी आकाशवाणीला सांगितलं आहे.