शिवसेना भवनासह शिवसेनेची सर्व मालमत्ता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

 


मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षाचे मुख्यालय शिवसेना भवनासह इतर सर्व स्थावर आणि जंगम मालमत्ता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. खासगी वकील आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानं मालमत्ताही त्यांना देण्यात यावी, अशी मागणी गिरी यांनी या याचिकेत केली आहे. इतर पक्षांच्या फुटीनंतर मूळ पक्षाला संपत्ती दिली गेली असल्याचा दावा त्यांनी केली आहे.