यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एस मोहापात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मोसमी पावसाला कारणीभूत ठरणाऱ्या अल निनो प्रवाहांचा जोर पुढच्या काही काळात कमी होण्याची शक्यता असून निना प्रवाहाचा प्रभावही बदलण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले. गेल्या ४ महिन्यात देशभरात ८७ सेंटीमीटर पाऊस झाला, अशी माहिती त्यांनी दिली.