आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रूपिनला रौप्य पदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारताच्या रूपिननं ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ग्रीको रोमनच्या स्पर्धांमध्ये भारताच्या नीरज छिकारानं ६३ किलो वजनी गटात कोरियाच्या जिन्सेब सॉन्गचा पाच - दोन असा, तर ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारनं जपानच्या मासातो सुमीचा पराभव केला.