एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेत अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेच्यावेळी आलेल्या तांत्रिक समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना आता २७ एप्रिलला पुन्हा परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची आहे, त्यांनी ११ एप्रिलपर्यंत अर्ज करावेत अशी सूचना सीईटी सेलनं केली आहे.

राज्यात एमबीए अभ्यासक्रमासाठी  सीईटी परीक्षा झाली होती. परीक्षा देताना नाशिकसह राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा देताना अडथळा आला होता. नाशिक इथल्या सीईटी सेंटरवर ४० मिनिटं आधीच ऑनलाईन पेपर सबमिशन बंद झाल्यानं  अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तर पत्रिका जमा करता आल्या नव्हत्या.