कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 2613 उमेदवार रिंगणात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागं घेण्याची मुदत काल संपल्यामुळे एकंदर 2613 उमेदवार रिंगणात असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोगानं प्रसिध्द केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार एकंदर 517 उमेदवारांनी अर्ज मागं घेतले.

त्यामुळे आता 2427 पुरुष, 185 महिला आणि एक इतर प्रवर्गाचा उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पार्टी सर्व 224 जागांवर,कॉंग्रेस 223 जागांवर, जनता दल सेक्युलर 207, आम आदमी पक्ष 208, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 4 जागांवर आणि 2 जागांवर नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. नोंदणीकृत गैरमान्यता पक्षांचे 639 उमेदवार रिंगणात असून, 918 जण अपक्ष उमेदवार म्हणून आपलं भवितव्य आजमावत आहेत.