इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत राज्यातली आरोग्य यंत्रणा सजग

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली आरोग्य यंत्रणा इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत सजग झाली आहे. येत्या काही दिवसात ही रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यासंदर्भात काल बैठक घेतली आणि सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचं ते म्हणाले. सर्दी, ताप, अंगदुखी यासारखी लक्षणं असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.