योग महोत्सव २०२३ मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग महोत्सव 2023 मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथल्या ताल कटोरा स्टेडिअम मध्ये आज आणि उद्या योग महोत्सव होणार आहे आणि येत्या 15 तारखेला मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेत महोत्सव साजरा केला जाणार आहे. या महोत्सवा नंतर योग शिक्षक, अंगणवाडी सेवक तसंच आयुष कर्मचाऱ्यांसाठी विशेष योग कार्यशाळेचं आयोजन केलं जाणार आहे.