लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा स्मृती इराणी यांचा महिलांना सल्ला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज महिलांना लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा सल्ला दिला. नवी दिल्ली इथल्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री भागीदारी परिषद २०२३ मध्ये त्या बोलत होत्या. 

भारतीय महिला शक्तिशाली परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहेत असंही त्या म्हणाल्या.  महामारीकाळात  डिजिटल सेवा वापरण्याची क्षमता महिलांनी त्यांनी  दृढपणे दाखवली आहे असं म्हणत त्यांनी, तळागाळात काम केलेल्या आरोग्यसेवेतल्या ६० लाख कर्मचार्‍यांचं यावेळी कौतुक केलं.