शहरी स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरुवात

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत शहरी स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत स्वच्छता उत्सवाची सुरवात केली. पुढचे ३ आठवडे देशभर चालणाऱ्या या अभियानाचं नेतृत्व महिला करणार आहेत. या अंतर्गत देशभर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, शहरं कचरामुक्त व्हावीत यासाठी  स्वच्छता आणि कचराव्यवस्थापन २०२३ या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून, तो यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत महिला त्याच नेतृत्व करतील. यानिमिताने १० ते ३० मार्च दरम्यान स्वच्छता यात्रा काढण्यात येणार असून ती २४ राज्यातून प्रवास करेल. यामध्ये ३४ राज्यांच्या महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image