आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज चौथ्यांदा अजिंक्य

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जनं काल दुबई इथं झालेल्या अंतिमसामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करुन चौथ्यांदा या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकलं. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या चेन्नई सुपर किंग्जनं ३ गडीबाद १९२ धावा केल्या. त्याला उत्तर देताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघाचा डाव ९ गड्यांच्या मोबदल्यात १६५ धावांवर आटोपला. ५९ चेंडूमध्ये ८६ धावा करणारा चेन्नई सुपर किंग्ज फाफ दु प्लेसीस सामनावीर ठरला. या विजयामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जनं चौथ्यांदा हा आयपीएल विश्वचषक जिंकला आहे.