वाळू उपशाचं नवं धोरण राज्यसरकार चालू अधिवेशनातच जाहीर करणार

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार वाळू उपशाचं नवे धोरण याच अधिवेशनात जाहीर करेल. यात वाळू लिलाव बंद करून शासन वाळू उपसा करणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली. सरकारने उपसा केलेली वाळू online,  offline पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. या वाळूचे दर सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहतील, असं ते म्हणाले.