राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या सत्तासंघर्षात राज्यपालांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर झालेल्या सुनावणीत तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातर्फे विधीज्ञ तुषार मेहता यांनी युक्तीवाद केला. सत्तेत सहभागी असलेल्या आमदारांनी दिलेल्या पत्राच्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश कसे काय काढू शकतात, असा प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केला. शिंदे गटाचे आमदार जर शिवसेनेचे सदस्य असतील, तर सभागृहात बहुमताचा संबंधच काय, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. सुमारे तीन वर्ष सत्तेत राहिल्यानंतर ३४ आमदारांनी अचानक भूमिका कशी काय बदलली, असा प्रश्नही न्यायालयानं शिंदे गटाच्या भूमिकेवर विचारला.