सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? उद्धव ठाकरे यांचा सवाल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. देशातल्या काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. मग महाराष्ट्र सरकार याबाबत आट्या पाट्या का खेळत आहे? जे हक्काचे आहे ते कर्मचाऱ्यांना मिळालंच पाहिजे, असं ठाकरे यांनी म्हटलंय.