विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार सोहळा संपन्न

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी मुंबई इथं तमाशासम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर तसंच संध्या रमेश माने आणि तमाशासम्राट अतांबर शिरढोणकर यांना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं.

गुलाबबाई संगमनेरकर यांना २०१८-१९ चा, अतांबर शिरढोणकर यांना २०१९-२० तर संध्या माने यांना २०२०-२१ चा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तमाशासम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांच्या वतीनं हा पुरस्कार त्यांच्या कन्या अल्का संगमनेरकर आणि कल्पना संगमनेरकर यांनी स्वीकारला.

तमाशा कलावंताच्या समस्या सोडवण्यासाठी सांस्कृतिक विभाग या कलावंतांच्या पाठीशी सदैव उभा राहील असं आश्वासनही मुनगंटीवार यांनी यावेळी दिलं. नवी मुंबईतल्या वाशी शहरातल्या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात तमाशा महोत्सव सुरु आहे.