मन की बात च्या शतकमहोत्सवानिमित्त आकाशवाणीचं अनोखं अभियान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा आकाशवाणीवरून प्रसारीत होणारा कार्यक्रम शतकमहोत्सवाकडे वाटचाल करत असून येत्या ३० एप्रिलला या कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारीत होईल. या निमित्तानं आकाशवाणी आजपासून एक अनोखं अभियान सुरू करत आहे. मन की बातच्या आतापर्यंत प्रसारीत झालेल्या भागांमध्ये प्रधानमंत्र्यांनी विविध क्षेत्रातल्या विविध विषयांवर देशवासियांशी हितगूज केलं. त्यांनी मांडलेल्या १०० विशेष संकल्पना आपण आमच्या सर्व बातमीपत्रातून ऐकू शकाल. ही मोहिम २९ एप्रिलपर्यंत चालू राहील.