राज्यातल्या महिला प्रवाशांना आजपासून एसटीच्या सर्व गाड्यांमध्ये लागणार निम्मे भाडे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या  महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याचा शासनाचा निर्णय आजपासून लागू करण्यात आला आहे. राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सरकारनं याबाबतची घोषणा केली होती.

एसटी महामंडळाच्या स्तरावर ही योजना, महिला सन्मान योजना म्हणून ओळखली जाणार असून, योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे. याशिवाय प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या इतर सवलतीही सुरू राहणार असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलं आहे.