नामिबिया इथून भारतात आणलेल्या साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नामिबिया इथून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात या साडेचार वर्षांच्या मादी चित्त्याला गेल्यावर्षी १७ सप्टेंबरला भारतात आणलं होतं. गेल्या सहा महिन्यांपासून आजारी असलेल्या या चित्त्याचा आज सकाळी मृत्यू झाल्याची माहिती आमच्या भोपाळच्या प्रतिनिधीनं दिली.