इसरोनं केलं SSLV-D२सह 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) श्रीहरीकोटा इथं इस्रोनं SSLV-D२सह तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो येत्या मार्च महिन्यात ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहक  PSLV आणि लघु उपग्रह प्रक्षेपण वाहक  SSLV चे प्रक्षेपण करणार आहे.

येत्या मार्च महिन्यात इसरो व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपणाला सुरुवात करणार असून युके वेब या कंपनीचे ३६ लघु उपग्रह, इसरो अवकाशात पाठवणार असल्याचंही ते म्हणाले. पुनर्वापर करण्याजोग्या  उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या सध्या चाचण्या सुरु असून या वर्षअखेरीपर्यंत भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त प्रकल्पाअंतर्गत निसार उपग्रहाच प्रक्षेपण इसरो करणार असल्याचंही सोमनाथ यांनी सांगितलं.