राज्यातल्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढं पुन्हा सुनावणी सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात आज पुन्हा सुनावणी सुरु झाली. आता सलग तीन दिवस सुनावणी सुरु राहणार आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूनं अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तर, देवदत्त कामत यांनी पक्षप्रतोद निवडीच्या मुद्यावर युक्तिवाद केला. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाच्या बाजूनं नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरू केला. हे प्रकरण याच आठवड्यात पूर्ण करण्याची न्यायालयाची इच्छा असल्याचे संकेत सरन्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान दिले.