पुण्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची राज्य महिला आयोगानं घेतली दखल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पुण्यात हवेली तालुक्यात दोन मुलींबाबत घडलेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कौटुंबिक रागातून मामानं आपल्या दोन भाच्यांना मारहाण करून या घटनेचं चित्रीकरण केल्याची  निंदनीय घटना घडली आहे. याप्रकरणी कलम ३५४ अंतर्गत आरोपीला अटक झाली आहे.

या घटनेत पीडित मुलींना मानसिक आधार देण्यासाठी त्यांचं समुपदेशन करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहेत. घरगुती वाद विवादातून निष्पाप मुलींशी असं गैरवर्तन करणं  ही मानसिकता चुकीची आहे, असंही त्या म्हणाल्या.