७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, करदात्यांसाठी नव्या आयकर रचनेत अनेक करसवलती

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांना आयकर भरणाऱ्यांसाठी विविध सवलतींची घोषणा केली. त्यानुसार नव्या कर प्रणाली अंतर्गत सात लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना प्राप्तिकर लागणार नाही. यापूर्वी ही मर्यादा ५ लाखाची होती. नवीन आयकर प्रणाली यंदापासून अधिक भर दिला जाणार आहे. मात्र जुन्या कर प्रणालीचा पर्याय करदात्यांसाठी खुला असल्याचंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. नवीन कर प्रणालीनुसार,  तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही प्राप्तिकर द्यावा लागणार नाही. ३ ते ६ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के, ६ ते ९ लाख रुपयांपर्यंत १० टक्के, ९ ते १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के, १२ ते १५ लाखांपर्यंत २० टक्के तर १५ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नासाठी आता ३० टक्के आयकराची घोषणा त्यांनी केली. तसंच साडेपंधरा लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असणाऱ्या पगारदारांसाठी आता साडे बावन्न हजार स्टँडर्ड डिडक्शन लागू होईल.