केंद्र सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरीबांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं आहे - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या प्रत्येक अर्थसंकल्पात गरीबांच्या हिताला प्राधान्य देण्यात आलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात देखील समाजाच्या सर्व स्तरातल्या नागरीकांचा विचार केला असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

पक्षाच्या खासदारांनी आपल्या मतदारसंघात गरीब आणि मध्यमवर्गीय नागरीकांशी संवाद साधून त्यांना अर्थसंकल्पातल्या विविध योजनांची माहिती द्यावी, असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी या बैठकीत केलं.