ससूनच्या समाजसेवा अधिक्षक विभाग प्रमुखपदी डॉ. शंकर मुगावे यांची नियुक्ती

 

पुणे : ससून सर्वोपचार रूग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक विभागाचे विभागप्रमुख म्हणून डॉ. शंकर मुगावे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मुगावे यांनी सलग १८ वर्षे ससून रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये समाजसेवा अधिक्षक या पदांवर सेवा केली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, ससून रुग्णालय व पुणे महानगरपालिका अंतर्गत नागरी आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र पुणे येथे समाजसेवा अधिक्षक पदाची जबाबदारी त्यांनी सहा वर्षे पाहिली. कोरोना संकटकाळात डॉ.मुगावे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय स्तरावरील रक्तपेढीत मुख्य समन्वयक म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे कार्य केले.

डॉ. शंकर मुगावे यांनी रक्तदान क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. त्यांनी आजपर्यत ९९ वेळा ऐच्छिक रक्तदान केले असून साडे तीन लाख रक्तदात्यांचे ऐच्छिक रक्त संकलन केले आहे. रक्तपेढींच्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनात्मक अभ्यास करून त्यांनी या विषयावर पीए.डी.पदवी संपादन केली. ते महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आहेत.