रिफायनरी राज्याच्या फायद्याची असल्याने ती उभारणार असल्याची उपमुख्यमंत्र्यांची माहिती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातली रिफायनरी राज्याच्या फायद्याची असल्यामुळे ती राज्य सरकार उभारणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या मृत्यू प्रकरणी उपस्थित लक्षवेधीवर ते बोलत होते.

ही रिफायनरी १०-१५ वर्ष राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी मदत करेल. या रिफायनरीची जागा सरकार चर्चेच्या माध्यमातून सोडवेल असंही ते म्हणाले. वारीसे यांच्या कुटुंबियांना २५ लाखाची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसंच हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची विनंती करू असं आश्वासन त्यांनी दिलं.