राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

 

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या. सुदृढ, निरोगी, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सर्वांगीण विकास साधण्यासाठी आजचा दिवस आपल्याला निश्चितच बळ देईल, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.

ज्येष्ठ समाजसेवकअण्णा हजारे यांच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा-आशीर्वाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा-आशीर्वाद दिले. श्री. हजारे यांनी शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची जोडगोळी गतिमान राज्यकारभार करत आहे, अशी भावना व्यक्त केली. श्री. अण्णा हजारे यांच्या सदिच्छा भेटीसाठी लवकरच राळेगणसिद्धी दौरा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.