हिंगोली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं पीक विमा द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरुच आहे. आज गोरेगाव ते जिंतूर मार्गावर टायर जाळून आंदोलक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पिक विम्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी मागील चार दिवसांपासून गोरेगाव इथं बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.

दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी उद्या गोरेगावसह हिंगोली आणि सेनगाव इथल्या बाजारपेठ बंदची हाक दिली आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे.