जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असा जागतिक बँकेला विश्वास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातल्या ७ उद्योन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असं जागतिक बँकेनं एका अहवालात म्हटलं आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६ पूर्णांक ६ टक्के असेल असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशाचा वृद्धी दर ९ पूर्णांक ७ टक्के राहण्याची शक्यता आहे. 

जागतिक अर्थव्यवस्था वृद्धीदर यावेळी अर्धा ते पावणे २ टक्के राहण्याची शक्यता आहे. पूर्वी हा दर ३ टक्के राहील, असं जागतिक बँकेनं म्हटलं होतं. यंदाच्या वर्षी जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या निकट येईल, अशी भीतीही जागतिक बँकेनं व्यक्त केली आहे. अमेरिका, युरोप आणि चीनच्या अर्थव्यवस्था कमजोर राहण्याचा जागतिक बँकेचा अंदाज आहे.