भारताच्या अमेरिका संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचा मोठा वाटा - डॉ. एस. जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांना समकालीन जगाची अत्यंत सूक्ष्म आणि विकसित समज होती. भारताच्या अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली  इथं तिसऱ्या अटलबिहारी वाजपेयी स्मृती व्याख्यानात बोलत होते.

वाजपेयींनी शीतयुद्धानंतरच्या वातावरणात अमेरिका-भारत संबंध बदलले. हे बांधलेलं नातं भारतासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर किती आणि कसं महत्त्वाचं आहे, हे त्यांनी समजून  सांगितलं. वाजपेयी हे देशाच्या महान प्रधानमंत्र्यांपैकी एक आहेत. वाजपेयींनी भारताचे रशियासोबतचे संबंधही दृढ आणि स्थिर ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, असंही ते म्हणाले.