ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांची मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी आज मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात त्यांनी ब्रिटनचा नील स्कुप्स्की आणि अमेरिकेची डेझीरे क्रॉसिक या तृतीय मानांकित जोडिला ७-६, ६-७,१०-६ असं पराभूत केलं.