वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालय आणि भारतीय पर्यटन विकास महामंडळादरम्यान सामंजस्य करार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयुर्वेद आणि इतर पारंपरिक चिकित्सा प्रणालींमध्ये उपचार घेण्यासाठी वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं आयुष मंत्रालयानं भारतीय पर्यटन विकास महामंडळासमवेत एक सामंजस्य करार केला आहे.

या करारानुसार, आयुष मंत्रालयाकडून, आयुर्वेद आणि इतर पारंपरिक चिकित्सा प्रणालींविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पर्यटन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देईल. आयुर्वेद आणि इतर चिकित्सा प्रणालींमध्ये वैद्यकीय पर्यटनाला वाव देण्यासाठी  या कराराचा त्याला लाभ होऊ शकेल.