मराठी हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई : मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मनामनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी, झी 24 तास या वृत्त वाहिनीचे संपादक निलेश खरे, साम टीव्ही मराठीचे प्रसन्न जोशी, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनचे संपादक अभिजित कांबळे, निवेदक अजित चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, मी महाराष्ट्रीय असल्याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेने जन्माला घातलेली विरासत ही जगातील दहा प्रमुख विरासतींपैकी एक आहे. विश्व मराठी संमेलन हे मराठी भाषा सर्वदूर पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. यनिमित्ताने मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित होईल, असेही त्यांनी सांगितले.

विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे उत्कृष्ट आयोजनासाठी विशेष कौतुक श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध देशातील मराठी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि उद्योग विभाग यांच्या सहकार्याने आयोजित विश्व मराठी संमेलनाचा उद्या समारोप होणार आहे.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image