देशात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात सध्या विक्रमी गुंतवणूक येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंदूर मध्ये जागतिक गुंतवणूकदारांच्या चर्चासत्राच्या उद्घघाटन प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलतांना सांगितलं. हे चर्चासत्र दोन दिवस चालणार आहे.

देशातल्या विशेषरुपानं तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमुळे देश गुंतवणूकदारांचं एक आकर्षक ठिकाण झालं आहे असंही ते म्हणाले. मध्य प्रदेशात सुरु असलेल्या या जागतिक गुंतवणूक परिषदेमुळे राज्यातल्या विविध गुंतवणूक संधी पाहायला मिळतील असंही ते म्हणाले. या परिषदेत ६५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.