औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे निलंबित

 

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं महिलेला छेडछाड केल्याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे याला निलंबित करण्याचे आदेश गृह विभागानं दिले. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी याबाबतचं पत्र आज जारी केलं आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार हे निलंबन करण्यात आलं असून जोपर्यंत निलंबनाचे आदेश अस्तित्वात असतील तो पर्यंत विशाल ढुमे याला औरंगाबाद पोलीस मुख्यालय पूर्वपरवानगीशिवाय सोडता येणार नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.