भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि-२० क्रिकेट सामना सूरु

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यातला तिसरा टि २० क्रिकेट सामना आज राजकोट मध्ये खेळवला जात असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या या टी २० मालिकेतला हा तिसरा आणि अखेरचा सामना आहे. या आधी भारत आणि श्रीलंकेनं एक एक सामना जिंकल्यामुळे या शेवटच्या सामन्यात मोठी चुरस आहे.